नवीन घर घेतल्यावर किंवा नवीन घर बांधल्यावर त्या घरामध्ये राहण्या अगोदर आपण गृह प्रवेश पूजा घरासाठी करतो त्या पूजा मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईकांना आणि इतर जवळच्या माणसांना निमंत्रण देतो. गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी आपल्याला पत्रिका मध्ये Griha Pravesh Invitation Message Marathi संदेश ची आवश्यकता पडते त्यामुळे आजचा लेखामध्ये आम्ही तुमचासाठी Griha Pravesh निमंत्रण संदेश घेऊन आलो आहेत.
Griha Pravesh Invitation Message in Marathi
स्वतःच घर घेणे किंवा घर बांधणे हे सर्वांचे एक स्वप्न असते ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण खूप मेहनत करतो आणि मेहनत करून पैसे जमा करून आपल्याला राहायला घर बनवतो. घरामध्ये राहण्याचा आधी आपण घराची पूजा करतो त्याला गृहप्रवेश पूजा असे म्हणतात. नवीन घरामध्ये हि पूजा सुरुवातीला केलीच जाते कारण त्या घरामध्ये वाईट कोणाची छायाचित्र पडू नये त्यासाठी हि पूजा केली जाते.
गृहप्रवेश निमंत्रण संदेश मराठी मध्ये
गृहप्रवेश पूजा चा दिवसी आपण एक पंडित ला बोलवतो आणि पुजासाठी जे समान लागते ते घेऊन येतो आणि हि पूजा सकाळी ठेवल्या वरती खूप शुभ मानले जाते. या गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण नातेवाईकांना आणि इतर आपल्या मित्र मैत्रीण व जवळच्या माणसांना घरी बोलवतो. जर आपले नातेवाईक आपल्या पासून लांब राहत असतील तर त्यांना ऑनलाईन निमंत्रण पत्रिका पाठवतो आणि त्या पत्रीकामध्ये एक निमंत्रण संदेश सुद्धा लिहतो तर ते संदेश तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत.
स्वप्न एका नव्या वास्तूचे,
साकार झाले आपल्या आशीर्वादाने,
कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे,
योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने,
तोरण या वास्तूवर चढावे,
आपणा सर्वांच्या साक्षीने,
रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने....
दिनांक:
वार:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे कि,
आमच्या नविन वास्तुची वास्तुशांती व सत्यनारायण पुजा दि. ०९/०४/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता
करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहुन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती..!!
नवीन बांधलेल्या वास्तूची वास्तुशांती समारंभ
करण्याचे योजिले आहे. ती या मंगल
प्रसंगी आपली उपस्तिथ प्रार्थनीय आहे.
दिनांक:
वार:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
आपणांस कळविण्यात्त आनंद होत की,
श्री कृपेवरून आमच्या नूतन वास्तुची शांती व गृहप्रवेश महापूजा मिती जेष्ठ वद्य ९ शके सोमवार दि. १२/०६/२०२३ रोजी दुपारी. १२:३० मि.
करण्याचे योजिले आहे तरी आपण उपस्थित राहून शुभप्रसंगी शुभशीवार्द द्यावेत हि विनंती..!
प्रत्येकाला हव असत एक आकाश उंच
भरारी घेण्यासाठी...
प्रत्येकाला हवं असत एक घर
संध्याकाळी परत येण्यासाठी.
दिनांक:
वार:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि,
शनिवार दि. ०१ सप्टेंबर 2023 रोजी सायं. 4 वाजता
आमच्या घरी वास्तुची शांती व गृहप्रवेश महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
तरी आपण सहपरिवार सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.