मराठी मध्ये जर वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा पाहत असतील तर तुम्हाला इथे नवीन वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा आई, बाबा, मित्र, मैत्रीण, आजी आजोबा आणि इतर माणसांसाठी मिळणार आहेत. तर वाढदिवस हा आपण वर्षा मधून एका वेळी साजरा करतो तो दिवस म्हणते ज्या दिवसी आपला जन्म झालेला असतो त्या दिवसी आपण वाढदिवस साजरा करतो. जर तुमच्या कोणाचा वाढदिवस असेल तर त्यांना खाली दिलेले वाढदिवस शुभेच्छा संदेश द्या हे संदेश पाहून त्याला तुमचा वरती गैर वाटेल.
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा – आई, बाबा, मित्र, मैत्रीण, नवरा, बायको
वाढदिवस असतो त्या दिवसी आपण वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा हेच वाक्य सांगतो परंतु तुम्ही तुमचा खास माणसासाठी एक सुंदर वाढदिवसासाठी वाक्य बोलायचे आहे ते वाक्य तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत. हे वाढदिवसाचे संदेश तुम्ही आई, बाबा, मित्र, मैत्रीण, नवरा, बायको, आजी, आजोबा, मावशी, मामा, मामी आणि इतर सर्व माणसांसाठी वापरू शकता.
जर तुम्हाला सुद्धा वाढदिवसासाठी संदेश पाहिजे असतील तर खाली खूप सारे हार्दिक शुभेच्छा म्हणून संदेश देण्यात आलेले आहेत.
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा आई [Happy Birthday Aai]
जर तुमच्या आई चा वाढदिवस असेल तर तीचासाठी तुम्ही एक सुंदर संदेश वाढदिवसाचा दिवसी द्यायचे आहे आणि हे संदेश तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत आणि हे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश फक्त आई साठी असणार आहेत.
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सर्व जबाबदारी पार करून
सर्व कुटुंबाच्या स्वप्न पूर्ण करून
नेहमी हसत असणाऱ्या माझ्या प्रिय
आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा बाबा [Happy Birthday Baba]
आपले बाबा म्हणजे आपल्यासाठी सर्वकाही आहेत तर बाबाचा वाढदिवस असेल त्या दिवसी तुम्ही बाबांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा सर्वात अगोदर द्या. जर बाबाला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा कसा द्यायचा हे माहित नसेल तर घाबरू नका कारण आम्ही तुमचा बाबासाठी नवीन मराठी मध्ये बाबांसाठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा संदेश आणले आहेत.
माझे प्रिय वडील, या वाढदिवसाच्या दिवशी मी आपल्याला आठवण करून देतो की आपण आमच्यासाठी महान प्रेरणा आहात! आपल्या दयाळू आणि संरक्षक हृदयाने आमच्या मार्गांना उजळवले आहे.
अभिनंदन! आज आणि नेहमी आनंदी राहा!
आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही.
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बाबा.
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा मित्रा [Happy Birthday Mitra]
मित्र म्हणजे आपला भाऊ सारखा जिवलग असतो आपण मित्रा सोबत कोणतीही गोष्ट लपवत नाही. जर तुमचा मित्राचा सुद्धा वाढदिवस असेल तर द्या त्याला नवीन वाढदिवसाचा शुभेच्छा आणि हे शुभेच्छा संदेश तुम्ही खाली पहा.
रॉयल जगता नाही आलं तरी चालेल पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!
तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण तर देवाकडे ऑर्डर देऊनच बनवून घ्यावे लागतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सगळ्यात बहुमूल्य गोष्ट ही दुकानात मिळत नाही.
पण मला ती तुझ्या रूपात मिळाली आहे,
मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तु माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र,
आधार आणि मार्गदर्शक आहेस.
माझ्या सर्व स्वप्नांच्या प्राप्तीसाठी
ज्या प्रकारे तु मला साथ दिली
त्याप्रमाणे मी नेहमीच तुझ्या सोबत राहीन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या मित्राच्या जिवनात
कधीही दुःख येऊ नये,
सदैव हसत खेळत सुख
आणि आंनद जीवनात नांदो.
ह्याच माझ्याकडून, या दिनी माझ्या
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा मैत्रीण [Happy Birthday Maitrin]
मित्र मैत्रींनी आपल्या साठी खूप महत्वाची असतात कारण जर आपण एखाद्या अडचणी मध्ये असून तेव्हा घरचा नंतर आपल्याला मित्र मैत्रींनीच मदत करतात तर तुमचा सुद्धा मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर तिला नवीन पद्धतीने वाढदिवसाचा शुभेच्छा द्या.
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी…,
हि एकच माझी इच्छा ,
तुझ्या भावी जीवनासाठी माझ्या सदिच्छा!,
माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आज देवापुढे हात जोडून मी एकच आशीर्वाद मागतो की,
हे देवा माझ्यासाठी अनमोल असणाऱ्या या व्यक्तीला,
आजच्या सुवर्णदिनी अनंत सुखे द्यावीत,
प्रिय मैत्रीणीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रात्रीला साथ चंद्राची, फुलाला साथ सुगंधाची
आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या ओव्हरस्मार्ट मैत्रिणीची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू फक्त माझी BEST FRIEND म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
HAPPY BRITHDAY DEAR BESTIE
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा नवरा [Happy Birthday Navra]
जर तुमचा नवऱ्याचा आज वाढदिवस असेल तर त्याला हे वाढदिवसाचे संदेश द्या. नवरा हा बायको साठी सर्व काही असतो कारण नवरा आपल्याला सुखात आणि दुखात कधीही सोडून जात नाही आणि नवरा हा प्रत्येक बायकोसाठी जग असतो तर अशा नवऱ्याला वाढदिवसाचा शुभेच्छा म्हणून एक सुंदर वाक्य सांगायचे आहे.
जशी दिसते राधाकृष्णाची जोडी छान,
तशीचं दिसते तुझी न माझी जोडी छान,
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आज तुझ्या दिवस आहे खास ,
जसा तू आहे माझ्या जीवनात खास,
या खास दिवसाच्या माझ्या प्रिय,
नवऱ्याला ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
अहो तुम्हाला वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा...
जन्मोजन्मी राहावे आपले नाते असेच अतूट,
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे परमेश्र्वराकडे प्रार्थना,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
कधी भांडतो कधी रुसतो पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू पण कायम सोबत राहू,
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा बायको [Happy Birthday Bayko]
बायको साठी नवरा जेवढा महत्वाचा आहे तेवढीच बायको सुद्धा नवऱ्याला खूप महत्वाची आहे. नवऱ्याला आयुष्यभर साथ देणारी बायको असते. जर आज तुमचा बायकोचा वाढदिवस असेल तर तिला हे वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश द्या.
माझ्या आयुष्याची खरी संपत्ती म्हणजे तू आहेस.
तुझ्या प्रेमाशिवाय मी अपूर्ण आहे.
तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझ्या हास्यातच माझं जगणं आहे.
तुझ्या स्पर्शातच माझं सुख आहे.
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यभर तुझ्या सोबत राहण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं, आणि ते पूर्ण झालं.
तुझा हा दिवस आनंदाने भरून जावो!
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा बायको!
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं
ओळखणाऱ्या माझ्या प्रिय
पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझ्या प्रेमाने माझं आयुष्य सुंदर केलं.
आजचा दिवस तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवणारा ठरो.
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!