नमस्कार, आज आपण लग्न पत्रिका चारोळी (Lagna Patrika Charoli) या विषयावर या लेखामध्ये चर्चा करणार आहोत. ह्या चारोळी आपण लग्न पत्रिका बनवतानी चारोळी संदेश चा उपयोग करतो. तर लग्न पत्रिका चारोळी यालाच लग्न पत्रिका कविता सुद्धा म्हणतात. लग्नाची पत्रिका बनवातानी सुंदर दिसायला आपण वाचायला वाटले पाहिजे त्यासाठी आपण नव नवीन कविता, चारोळी चा वापर करत असतो. तर असाच आज मी तुमचासाठी नवीन Lagna Patrika Charoli घेऊन आलो आहे या सर्व नवीन लग्न चारोळी तुम्हाला पसंद येतील.

प्रत्येक मुला मुलांचे लग्न आयुष्यात एकदा करावेच लागते. लग्नामुळे दोन वेगळे कुटुंब एकत्र येतात आणि वधूवरांनी त्याचं आवडत नात मिळते. लग्न करण्या अगोदर आपल्याला वधूवरांचे साखरपुडा करावा लागतो त्यानंतर लग्नाची तारीख ठरवावी लागते. तारीख ठरवून झाल्यावर आपल्याला लग्नाची तयारी खूप दिवसा अगोदरच करावी लागते. पण सर्वात मोठ काम म्हणजे लग्नाची पत्रिका कशी बनवायची कारण लग्न पत्रिका हि घरो घरी नेऊन द्यायची असते त्यामुळे आपला लग्न पत्रिकेचा मजकूर हा चांगला बनवायला पाहिजे. तसेच आपण लग्न पत्रिकेमध्ये चारोळी सुद्धा चांगली लिहावे जेणेकरून लग्न पत्रिका बघणाऱ्यांना चांगल वाटेल.

लग्न पत्रिका चारोळी संदेश – Lagna Patrika Charoli
वधुवरांसाठी Lagna Patrika Charoli खाली दिलेल्या आहेत:
1. लग्न म्हणजे नाही फक्त समारंभ, तर लग्नात जुळतात शतजन्माच्या गाठी देतो आग्रहाचे निमंत्रण कारण, तुमचेच आशीर्वाद हवेत नवरदेव नवरी च्या पाठी
2. सूर जुळले दोन अंतरीचे, जुळतील दोन कुटुंबांची मनं लग्नाचा आनंद होईल द्विगुणित, फक्त तुमच्या येण्यानं.
3. लग्नाच्या निमित्ताने होतील, आपल्याही भेटीगाठी म्हणूनच पत्रिका पाठवतो, खास तुमच्या येण्यासाठी
4. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने, दोन कुटुंबांच्या भाव-भावना एकाच धाग्यात विणल्या जातील जेव्हा सगळी जवळची लोकं, विवाह सोहळ्याला येतील

5. लग्न समारंभाचा थाट सगळा, ऋणानुबंध जुळण्यासाठी तुमची उपस्थिती अनिवार्य, तुमची आमच्यावर किती माया फक्त हे कळण्यासाठी
6. होईल गोड नात्याला सुरुवात, बहरून येईल प्रीती पण हे तेव्हाच होईल साध्य जेव्हा असतील तुमचे आशीर्वाद आणि तुमची उपस्थिती
7. आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे ….परिवार आणि……… परिवार सहर्ष स्वागत करीत आहे
8. स्वागत नव्हे फक्त हा तर आहे जिव्हाळा पाहुण्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा
9. यंदा घातलाय आमच्या लग्नाचा घाट, उपस्थित राहून सर्वांनी बाढवा शुभकार्याचा थाट.
10. …आणि… ची जमली जोडी, लग्नाला येऊन सर्वांनी वाढवा दिवसाची गोडी.
11. आग्रहाचे निमंत्रण करतो बघण्या फेरे सात, … आणि… वर असूद्या आशीर्वादाचा हात.
12. लग्नामुळे जुळतात सासर आणि माहेर, तुमचा प्रेमळ आशीर्वाद हाच आमचा आहेर.
13. तुमचा आशीर्वाद राहो सदैव आमच्या पाठी, नक्की या … आणि… च्या रेशीमगाठी.
14. नवऱ्याचे नाव आणि नवरीचे नाव जुळले सूर, तुमच्या येण्यानं होईल आनंद भरपूर.
15. ….व… ची जुळणार जन्मोजन्मीची नाती उपस्थित राहून उधळा आपल्या आशीर्वादाने मोती.
16. लग्नकार्य म्हणजे सुख – आनंदाची सभा, तुमच्या येण्याने वाढेल समारंभाची शोभा.
अशा प्रकारे आपण लग्न पत्रिका चारोळी पत्रिकेमध्ये लिहू शकतो जर तुम्हाला ह्या चारोळ्या आवडल्या असतील तर तुम्ही लग्न पत्रिकेमध्ये या चारोळ्या लिहू शकता. लाग्नाचासाठी आमंत्रण पत्रिका कशी बनवायची हे खाली दिलेले आहे ते सुद्धा एकदा बघून घ्यावे.