30+ Marathi Poems On Nature – Marathi Nisarg Kavita निसर्गावर मराठी कविता

नमस्कार, मी तुमचासाठी सुंदर निसर्गावर कविता मराठी मध्ये लिहिलेल्या आहेत. आजचा लेखामध्ये तुम्हाला नव नवीन Nisarg Kavita Marathi मध्ये बघायला मिळणार आहेत. मित्रांनो आणि मैत्रींनो निसर्ग हे सगळ्यांना खूप आवडते कारण चांगले निसर्ग असल्यामुळे आपली चांगली आरोग्य असते. आपण कुठे फिरायला किंवा इतर कामासाठी जातो तेव्हा आपल्याला Marathi Nisarg Kavita गरज पडते. आज मी तुमचासाठी 30+ Marathi Poems On Nature घेवून आलो आहे त्यामुळे तुम्हाला ज्या कविता आवडतात त्या तुम्ही तुमचा कामासाठी वापरू शकता. Environment वरती Poem लिहायला खूप आवडते कारण सर्वाना निसर्ग खूप आवडत असतो त्त्यामुळे संदूर कविता लिहिल्या आहेत. Short Marathi Poems On Nature खाली दिलेल्या आहेत.

Marathi Nisarg Kavita

पाऊस येतो.. मनाला नेतो

दूरच्या नभाची ..सवारी देतो..

स्वप्नांना थेंबात पेरूनी मातीत

डोलतो डौलात हिरवळ वेशात..

उमेद सुखाची जीवन भाषा

हरवू नको तू जगण्यात आशा

सांगत असतो थेंबात साऱ्या

भिजून घे तू विसरून साऱ्या..

Marathi Nisarg Kavita
Marathi Nisarg Kavita

Best 10 Poem On Nature In Marathi – निसर्गावर मराठी कविता

तुमचासाठी सगळ्यात सुंदर निसर्गासाठी कविता मराठीमध्ये घेवून आलो आहे.

बूडत जातो श्वास श्वास अन
झाडाची मग आठवण येते
विकत घेतल्या ऑक्सिजनने
पाना पानाची किंमत कळते.

उन्हाने जीव तडफडतो अन
छायेची होते आठवण जेव्हा
रस्त्याजवळ झाडांची प्रेते
हतबलतेने म्हणतात तेव्हा.

सावलीचा मी धनी नाही पण
खोडांवरती बसू शकतोस
विश्रांती घे जरा क्षणभर
भोवळ आल्याने का घाबरतोस.

मातीने साथ दिली तर
पुन्हा नव्याने रुजेन म्हणतो
असतील मुळं जीवंत माझी तर
तुझ्यासाठी पुन्हा अंकुरतो.

भविष्यात मला तू ये भेटायला
तुझ्यावर सावली पांघरतो
उभ्या उन्हाचे घाव सारे
बघ कसे माझ्यावर झेलतो.

ऋण माझे मानू नकोस
एवढा फक्त विचार कर
तू जिवंत आहेस माणसा
मी जोवर आहे पृथ्वीवर.

नभ शामल सावळे
दाटताच आसमंती
तृप्त तापलेली सृष्टी
माळे नवीनच कांती.

पसरे सौंदर्य धरेचे
थेंब अंगी झेलतांना
वेडावते वेडी राधा
जसा कृष्ण भेटतांना.

ओल सरींनी दाटली
ओल्या मातीच्या मनात
गेले भेगाळले तन
भेग तिच्या काळजात.

पाऊसधारा सांजवेळी
बरसती गंधाळूनी
कोवळा अंकुर जसा
उमलतो फांदीतूनी.

हे पण वाचा: Lagna Patrika Marathi Namuna PDF.

30 + Other Nisarg Kavita In Marathi

तुमचासाठी अजून जास्त निसर्ग कविता मराठी मध्ये दिलेल्या आहेत. आवडल्या तर नक्की तुमचा मित्रांना पाठवा.

बेधुंदीत ह्या धारा
झाल्या खट्याळ आगळ्या तरुवरील फुलांच्या
झाल्या पाकळ्या पाकळ्या…

माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल
माझा अनुभव कधी घेतलाच नसेल.

माझ्या कुशीत कधी येऊन पहा
कधी मलाही तुम्ही जवळून पहा.

सुंदरता अजूनही माझ्यात आहे
बस तुमच्या मदतीचा साथ पाहे.

नभातून अवतरली
सुर्याची सोनेरी पहाट
जागोजागी हिरवळचं हिरवळ
बहरला सृष्टीचा थाट

सोबत घेऊनी
किरणांची आरास
रंगीबेरंगी फुलातून
सुगंधी सुवास.

खळखळणाऱ्या झऱ्यातून
भासे पैंजणांचा नाद
पक्षी किलबिल करून
देती त्याला साद.

गवताच्या पात्यांवर
भिजलेले ते तुरे मखमली
सृष्टीचे ते रंग छेडण्या
फुलपाखरे उडती इवली इवली.

उंचच उंच उभी राहिली
नारळाची झाडे
हिरव्या रानी पसरले
प्राजक्ताचे सडे.

चंद्र जरासा लपतो
क्षितिजाच्या पल्ल्याड
वर्षानुवर्षे बदलत असे
निसर्गाचे घड्याळ.

या वृक्षाच्या फांदीवरती
पाने इवली इवलीशी
फुला मुलांची सृष्टी सुंदर
चिमणी सांगे चिमण्यांशी.

फांदीवरती बांधून घरटे
रचती स्वप्ने पहाटेची
निळ्या मनातील मेघ निळे
रेघ शिकवती वाटेची.

फुला फळासम हालत डोलत
नृत्य खेळती तालात
माधुर्याची पाखरण भरली
चिमण्या गालागालात.

मखमली गावतावरती गोंडस
राजहंस हळू हुंदडते
खेळ खेळता अवखळ निर्झर
मन मेघाचे ओघळते.

हिरव्या ऋतूची शाल पांघरून
तळ्यात अपुले रूप गोंजरुन.

अवतरला तो
बदलून हवा
चारी दिशा नभी
धुंदला गारवा.

धरणी नटली
लावण्य साजरी
पर्वत दऱ्यांच्या
मिठीत लाजरी.

बरसून धारा
झिरपून रस
कणाकणांतून
नदी सोमरस.

निसर्गाची लय
गर्वाने मिरवा
मोहवी स्पंदने
हा ऋतू हिरवा.

हिरवेगार डोंगर
त्यावर सोनेरी पहाट
इवल्याशा पाखरांचा
मोठा किलबिलाट.

चिव चिव चिमणी
कुहू कुहू कोकीळ
सूर्य उगवला म्हणून
गाणी गातात मंजुळ !

सकाळच्या कोवळ्या
कोवळ्या उन्हात
प्रजाक्तांच्या फुलांचा
पडतो सडा दारात !

किती आनंद देईल
आपल्या हृदयात
मनाच्या कोपऱ्यात
निसर्गाच्या सानिध्यात !

हेच सगळे आहे
आपल्या मनामनात
म्हणून तर आहे
आपण हिरव्यागार निसर्गात.

रिमझिम पावसाची गाणी
धरती ऐकू लागली
झांडामधल्या झोक्यामधूनी
कळी फुलूनी आली….

माती मधूनी गंध दरवळला
आसंमतात फुलूनी गेला
वारयासोबत कधी खेळताना
फेर धरुनी आला…..

पक्ष्यांचा चिवचिवाट
आता पावसात भिजूनी गेला
पानांवरल्या दवबिंदूचा
थेंब फुलूनी आला.

वाटते कधी तरी थेंबांना
गीत पावसाचे गावे
मंत्रमुग्ध डोलत राहून
पावसाच्या स्वागताला यावे.

अशा प्रकारे निसर्गावर मराठी मध्ये कविता लिहिल्या आहेत (Short Marathi Poems On Nature). अधिक कविता या लेखामध्ये कविता लिहिल्या जातील त्यामुळे हि पोस्ट तुमचा मित्राला किंवा मैत्रीण ला पाठवू शकता. आजचा Marathi Nisarg Kavita या लेखामध्ये मी तुमचासाठी सुंदर कविता लिहिल्या आहेत.

Leave a Comment