Vastu Shanti Invitation Message in Marathi – वास्तुशांती निमंत्रण संदेश

आपण मेहनत करून आपले स्वप्न साकार करत असतो, त्यामध्ये सर्वांचे घर घेण्याची स्वप्न असतात. आपण नवीन घर घेतल्यावर किंवा नवीन घर बांधल्यावर आपण एक घरी पूजा ठेवतो त्या पूजाला वास्तु शांती किंवा गृहप्रवेश पूजा असे म्हणतात. या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आपल्याला एक निमंत्रण पत्रिका बनवावी लागते त्यामध्ये Vastu Shanti Invitation Message मराठी मध्ये लिहावे लागते.

Vastu Shanti Invitation Message in Marathi

आपले नवीन घर पूर्ण बांधून झाल्यावर त्या घरामध्ये राहण्याअगोदर आपण वास्तुशांती पूजा करतो त्यासाठी आपण सर्व नातेवाईकांना, मित्र आणि मैत्रिणी व इतर जवळच्या माणसांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देतो. वास्तुशांती निमंत्रण देतानी आपण पत्रिकेमध्ये एक सुंदर संदेश लिहून देतो परंतु खूप काही माणसांना हे संदेश कसे लिहायचे हे माहितच नाही त्यांचासाठी आम्ही तयार केलेले वास्तुशांती निमंत्रण संदेश (Vastu Shanti Invitation Message in Marathi) मराठीमध्ये घेऊन आलो आहेत.

वास्तुशांती निमंत्रण संदेश मराठी

वास्तुशांती कार्यक्रमासाठी निमंत्रण संदेश खाली देण्यात आलेले आहेत.

झाली देवाची कृपा झाला आम्हाला आनंद
नवीन घराचा आनंद शेअर करावा तुमच्यासोबत
म्हणून ठेवली आहे वास्तुशांतीची पूजा
नव्या घराच्या द्या आम्हाला वास्तुशांतीच्या शुभेच्छा.

दिनांक:
वार:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
एक वीट श्रमाची… एक वीट कष्टाची एक वीट आई वडिलांच्या आशिर्वादाची
एक वीट बहिणीच्या प्रेमाची… आता हवी एकच वीट आपल्या सहकार्याची.

दिनांक:
वार:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
सप्रेम नमस्कार वि. वि.
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि,
आमच्या नवीन वास्तूची शांती व सत्यनारायणाची महापूजा
__वार दिनांक __ रोजी __ वाजता आयोजित केली आहे.
तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळ
उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती…

स्थळ:
निमंत्रक:
आमच्या शुभेच्छांनी यावी तुमच्या आयुष्यात बहर
नव्या घरात पडावे तुमचे शुभ पाऊल,
आनंदाने करावा तुम्ही गृहप्रवेश, वास्तुशांतीच्या शुभेच्छा!

दिनांक:
वार:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
ईश्वराचा आशीर्वाद
श्रमाचे साफल्य, आई – आजीची पुण्याई,
मनाच्या स्पंदनात रचलेले सुंदर स्वप्न,
म्हणजे __ सदन
आमच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी वास्तुशांती सोहळ्यास
सहकुटुंब उपस्थित राहून आमच्या आनंदात
सहभागी व्हावे ही विनंती…

दिनांक:
वार:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:

Leave a Comment