Lagna Patrika Format – लग्नपत्रिका मजकूर, लग्न स्वागत समारंभ पत्रिका

Lagna Patrika Format: भारतीय संस्कृतीमध्ये सर्व प्रथम आपण देवाला म्हणजे परमेश्वराला आमंत्रण पत्रिका देतो त्यानंतर आपल्या नातेवाईकांना आणि मित्र-मित्रींना आमंत्रण देतो. मित्रांनो आज आपण लग्नपत्रिका मजकूर या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सर्वात अगोदर लग्न म्हणजे काय असते? आणि लग्नासाठी लग्न स्वागत समारंभ पत्रिका का देतात या मुद्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच लग्नासाठी आमंत्रण पत्रिका कसी बनवायची या लेखातून पूर्ण माहिती दिली जाणार आहे.

marathi lagna patrika majkur
lagna patrika format image

लग्नपत्रिका मजकूर- Lagna Patrika Format in Marathi

लग्न पत्रिकेतील मजकूर (lagna patrika namuna) हा खूप महत्वाचा आहे कारण लग्न पत्रिका बनवण्यासाठी मजकुरामध्ये माहिती बरोबर असावी त्यासाठी सर्वात अगोदर कोणत्याही देवाचे नावे आणि फोटो असतो. त्यानंतर वधुवरांची नावे आणि त्यांचा आई वडिलांची नावे, नंतर शुभ विवाह सोहळा आणि मुहूर्त टाकावे लागते, हळदी समारंभ, आपले नम्र, विवाह स्थळ आणि निमंत्रण एवढ्या गोष्टी लग्नाच्या मजकुरामध्ये टाकावीच लागते या सर्व विषयावर आपण खाली चर्चा करणार आहोत.

lagna patrika format
lagna patrika format

1. देवाचे नावे आणि फोटो: लग्नाची मजकूर [पत्रिका आमंत्रण] तयार करतानी सर्वात अगोदर आपल्या देवाचे नाव आणि देवाचे फोटो मजकूर मध्ये टाकतो. उदा. श्री गणेशा, श्री गणेशाय नमः

2. वधुवरांची नावे: वधुवरांची नावे उदा. चि. अजय आणि चि.सौ. का. ममता असा प्रकारे वधुवरांची नावे टाकून घेतो त्या खाली वधूवरांच्या आई वडिलांची नावे टाकायची आहेत.

3. शुभ विवाह सोहळा आणि मुहूर्त: शुभ विवाह सोहळा मध्ये आपण लग्नाची तारीख आणि मुहूर्ताचा वेळ टाकतो. लग्नाचा मुहूर्त कधी ठेवायचा हे पंडित ठरवत असतो. उदा. मिती माघ कृ. २ शके १२९२ रविवार दि. २०/०५/२०२५ रोजी दु. ११ वा. ३० मि. या शुभमुहूर्तावर शुभ विवाह आयोजित केले आहे.

4. हळदी समारंभ: त्या नंतर हळदी समारंभ मध्ये हळदी कधी आहे त्याची दिनांक, वार आणि वेळ लिहितो. उदा. सोमवार दि. ०८ जून २०२५ रोजी दु. ०३ वा १५ मि. [हळदी समारंभ].

5. आपले नम्र: आपले नम्र मध्ये आजोबांचे नाव आणि त्या नंतर आई-वडिलांची नावे आणि मग आपल्या सर्व नातेवाईकांची नावे टाका.

6. विवाह स्थळ: विवाह स्थळ मध्ये जिथे लग्न शुभ विवाह असेल त्यांचा गावाचा पत्ता, वार आणि दिनांक टाकायचे आहे. उदा. डहाणू पाटीलपाडा, तालुका डहाणू-४०१६०६, वार- सोमवार आणि दि. २०/०५/२०२५ रोजी.

7. निमंत्रण: निमंत्रण मध्ये समस्त पाटील [तुमचे आडनाव टाका] परिवार.

लग्न स्वागत समारंभ पत्रिका का देतात?

आधीचा काळात डिजिटल युग नव्हते त्यामुळे लग्नासाठी बोलवण्यासाठी लग्न आमंत्रण पत्रिका नातेवाईकांच्या घरोघरी जाऊन देत होते. पण आजचा युगात खूप काही बदल झालेले आहे कारण आजचा डिजिटल काळात इंटरनेट ची सुविधा आलेली आहे त्यामुळे लांबचा नातेवाईकांना मोबाईल चा आधाराने Whatsapp Lagna Patrika आमंत्रण पाठवतो. लग्नाच्या अगोदर स्वागत पत्रिका सर्व नातेवाईकांना घरी जाऊन द्यायला लागते तर सर्व नातेवाईकांना लग्नाची बातमी किंवा खबर असेल. स्वागत समारंभ पत्रिका आधुनिक काळापासून देतात त्यामुळे आज सुद्धा ही परंपरा सर्व कुटुंबामध्ये पूर्ण केली जाते.

स्वागत समारंभ पत्रिका मराठी
स्वागत समारंभ पत्रिका मराठी

लग्न निमंत्रण संदेश मराठी, लग्न पत्रिका चारोळी, आग्रहाचे निमंत्रण लग्न शायरी आणि लग्नपत्रिका मजकूर

लग्नाचे निमंत्रण संदेश, उखाणे, चारोळी आणि शायरी खाली दिलेली आहेत. ज्या वधूवरांना आमंत्रण संदेश आवडतो ते आमंत्रण पत्रिकेमध्ये लिहावे.

“सुरज आणि सोनाली ची जमली आता जोडी… लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी.”

“आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात… अजय आणि ममता वर असू द्या, आशीर्वादाचा हात.”

“लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर… तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर.”

“तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी… नक्की या जुळताना, प्रदीप आणि मोनाली च्या रेशीमगाठी.”

“योगेश आणि प्रियांका चे जुळले आता सूर … तुमच्या येण्यानं होईल, आनंद भरपूर !.”

“अजय व ममता ची जुळणार, जन्मोजन्मीची नाती… उपस्थित राहून उधळा, आपल्या आशीर्वादाचे मोती.”

“लग्नकार्य म्हणजे, सुख-आनंदाची सभा… तुमच्या येण्यानं वाढेल, समारंभाची शोभा.”

“कुणाल व पूनम च्या लग्नाकडे, डोळे लागले जगाचे… आहेरात आणा फक्त, अनमोल गिफ्ट आशीर्वादाचे.”

3 thoughts on “Lagna Patrika Format – लग्नपत्रिका मजकूर, लग्न स्वागत समारंभ पत्रिका”

Leave a Comment