नमस्कार, आज आपण लग्नासाठी आग्रहाचे निमंत्रण (Aagrahache Nimantran Lagna Patrika) कसे लिहायचे त्याबद्दल चर्चा करणार आहोत तर प्रत्येकाचा आयुष्यात एक वेळ अशी येते कि त्यांना लग्न कराव लागते तर असाच कारणामुळे जर कि तुमचे लग्न ठरले असेल तर तुम्हला तुमचा नातेवाईकांना आणि इतर मित्र मंडळीना लग्नाचे आमंत्रण पत्रिका द्यावी लागते त्यामुळे आपण आग्रहाचे निमंत्रण संदेश लग्नासाठी एक वाक्य लिहायचे आहे. जेणेकरून आपल्या येणाऱ्या नातेवाईकांकडून आणि इतर मंडळी कडून आशीर्वाद मिळेल. लग्नासाठी आपल्याला आग्रहाचे निमंत्रण खूप चांगले लिहायला पाहिजे कारण आपल्या लग्नाची पत्रिका हि सर्वाना वाचायची असते त्यामुळे त्यांना सुद्धा वाचून खूप चांगल वाटेल.

आग्रहाचे निमंत्रण लग्न पत्रिका (Aagrahache Nimantran Lagna Patrika)
आग्रहाचे निमंत्रण लग्न पत्रिका तुम्हाला खाली दिलेला आहे तर तुम्ही लग्न निमंत्रण पत्रिका हि खाली दिलेली आहेत तसी बनवून तुमचा नातेवाईकांना आणि मित्र मैत्रींना पाठवू शकता परंतु हे आग्रहाचे निमंत्रण लग्न पत्रिका फक्त तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता किंवा अशा लग्न पत्रिका फक्त तुमचा खास नातेवाईकांना आणि मित्र मैत्रींनाच देवू शकता.

लग्नासाठी चारोळी (Lagna Charoli) आणि लग्नासाठी उखाणे (Lagna Ukhane)
मित्रांनो जर तुमचे लग्न तुमचा प्रेमळ व्यक्तीसोबत ठरल असेल तर तुम्ही त्या व्यक्तींसाठी चारोळी किंवा उखाणे सांगून त्यांना आनंद देवू शकता. हे लग्नाचे उखाणे तुम्ही तुमचे लग्न वेळेस वापरू शकता कारण या उखाण्यांचे काम लग्नाचा वेळेस आपल्याला सांगायला लागते. हे चारोळी किंवा उखाणे सांगून लग्नामध्ये आलेले सर्व कुटुंबाना आपण हसवू शकतो त्यामुळे तुम्ही एक खूप सुंदर उखाणा आपल्या नवरा किंवा नवरी साठी बोलायला आहे. तर लग्नासाठी चारोळी, उखाणे खाली दिलेले आहेत.
लग्न चारोळी आणि लग्नासाठी कविता
Lagna Choroli & Lagna Kavita (लग्नासाठी चारोळी खाली आहेत):
“उपस्थितिने तुमच्या सज्जनहो, आज हे जीव फुलांसारखं बहरत आहेत.. मंडपाखाली सजलेली ही दोन पाखरं, नवजीवनाच्या नभांगणी स्वच्छंदी विहारत आहेत.”
“पडता पाऊले तुमची वाढे शोभा मंडपाची, माथ्यावरती पडोत अक्षता तुमच्या आशीर्वादाची”
“लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हे तर सात फेऱ्यांनी जोडले जाणारे ऋणानुबंध काही क्षण ओठावर हसू फुलविण्यासाठी तर काही अलगद पापण्या ओलावण्यासाठी”
“दोन जीवांच्या मिलनाचा सोहळा, नभातून पाहे चंद्रमा अन् चांदण्या..झुकला दिनकर ही बघा मावळतीला, वर वधूच्या गाली हास्यलाली गोंदण्या.”
“मावळतीला निघालेल्या दिनकराच्या साक्षीने, नवजीवनाची लाली चोहिकडे पसरते आहे.. उपस्थित सज्जनांच्या मांदियाळीने, मंडपी आशीर्वादांच्या अक्षतांची आज बरसात होते आहे.”
“महती आजच्या दिनाची काय मांडावी, वाटे तुमच्या उपस्थितीची मनोभावे पूजा बांधावी.. डोई अक्षतांचे आशीर्वाद देऊन आपण मग, ज्योत नवदांपत्याच्या जीवनाची उजळावी…”
लग्नासाठी उखाणे
Lagna Ukhane (लग्नासाठी उखाणे खाली आहेत):
“उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात___आणि ___ ची जोडी आहे जबरदस्त.”
“चांदीच्या ताटात गाजराचा हलवा, ____रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा”
“नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले, ___रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.”
“प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा, शोधून नाही सापडणार___सारखा हिरा.”
“एका वर्षात, महिने असतात बारा, ____मुळे वाढलाय, आनंद सारा.”
“मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, ____रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.”
“बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला, ____ च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?”
“माहेरी साठवले, मायेची मोती, ___च नाव घेऊन, जोडते नवी नाती.”
लग्न पत्रिका डिझाईन मराठीत
मित्रांनो, आपल्या कुटुंबांचे किंवा स्वतःचे लग्न ठरल्या नंतर आपल्याला लग्न पत्रिका निमंत्रण आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्र आणि मैत्रींना द्यायला लागते तर आपल्याला लग्न पत्रिकेची डिझाईन हि नवीन आणि सुंदर दिसायला पाहिजे त्यासाठी आपण नवीन नवीन लग्न पत्रिका डिझाईन शोधात असतो परंतु मी तुमचासाठी नवीन लग्नाची पत्रिका डिझाईन घेवून आलो आहे तर ह्या लग्न पत्रिका डिझाईन तुम्हाला खाली दिलेल्या आहेत.

अशा प्रकारे आपण आज या लेखातून आग्रहाचे निमंत्रण लग्न पत्रिका, लग्न चारोळी, लग्न पत्रिका डिझाईन मराठी मध्ये बगीतले आहे. जर तुम्हाला या लेखाबद्दल काही अडचणी आल्यावर तुम्ही आमचासोबत संपर्क करू शकता.
हे पण वाचा:
1 thought on “आग्रहाचे निमंत्रण लग्न पत्रिका, लग्न चारोळी, लग्न पत्रिका डिझाईन मराठी मध्ये”