भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस | Bhavpurna Shradhanjali Status Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस माहिती

Bhavpurna Shradhanjali Status या लेखामध्ये आज तुमचासाठी भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस घेवून आलेलो आहे हे स्टेटस तुम्ही मृतू झालेल्या व्यक्तींसाठी व्हॉट्सॲप स्टेटस् लावू शकता. आपल्याला कोणतीही व्यक्ती सोडून गेल्यावर खूप दुःखाचे दिवस येतात परंतु मृतू ला आपण थांबवू शकत नाही. जर तुमचा आई बाबांचे, भाऊ बहिण, मित्र, मैत्रीण चे मृतू होते तेव्हा आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश आपल्या व्हॉट्सॲप ला लावायचे आहे किंवा हे संदेश तुम्ही त्यांचा आत्माला शांती मिळावी म्हणून एक वाक्य भावपूर्ण श्रद्धांजली बोलू शकता.

Bhavpurna Shradhanjali Marathi Status

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस व्हॉट्सॲप ला किंवा इतर सोसिअल मेडिया ला आपण स्टेटस लावतो कारण आपल्या आठवणी मृतू झालेल्या व्यक्ती सोबत जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला सर्वात जास्त दुख होते त्यामुळे आपण दुख व्यक्त करण्यासाठी आणि मृतू झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली मिळावी त्यासाठी आपण हे व्हॉट्सॲप भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस लावतो. हि भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस तुम्ही सर्व व्यक्तींसाठी वापरू शकता तर हे संदेश तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत.

आईसाठी भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस्:

Aai sathi Bhavpurn Shradhanjali Status
Aai sathi Bhavpurn Shradhanjali Status
  1. आईच्या प्रेमाचा सुगंध अजूनही घरभर पसरलेला आहे, आई तुझ्या आठवणींना आज भावपूर्ण श्रद्धांजली.
  2. आई, तुझ्या शिकवणीने जगण्याचा मार्ग सापडला, तुझ्या आत्म्याला शांती मिळो, हीच प्रार्थना.
  3. आई, तुझ्या मायेची सावली आजही आमच्यावर आहे, तुझ्या स्मृतींना आदरपूर्वक वंदन करतो.
  4. आई तुझ्या हातचा स्वयंपाक, तुझी काळजी आणि तुझं बोलणं आठवतं, तुझ्याशिवाय आपल घर सुनं सुनं वाटतं भावपूर्ण श्रद्धांजली आई.
  5. जगातील सर्वात श्रीमंत होतो आम्ही, आमच्याकडे तू होतीस म्हणून, आज तुझ्या आठवणींचं धन जपून ठेवलंय.
  6. लहानपणी घेतलेला तुझा आधार, आज हवाहवासा वाटतो आई, आई तुझ्या आठवणी येऊन माझ्या डोळ्यात अश्रू येतात.
  7. आईची माया, तिचा लाडका आवाज आणि तिचं हसणं खूप आठवते तिच्या आठवणींशिवाय एक क्षणही जात नाही.
  8. आई तुझ्या प्रेमाची सावली आज नसली तरी, तुझे संस्कार आमच्यात आयुष्यभर राहतील भावपूर्ण श्रद्धांजली आई.
  9. तुझ्या डोळ्यातलं प्रेम आणि काळजी आजही जाणवते, आई तुझ्या आठवणी मला रडवतात आणि हसवतातही.
  10. स्वर्गात जाऊन सुद्धा तू आमची काळजी करत असशील, आई तुझं प्रेम अनमोल आहे तुमचा आत्मास शांती मिळावी हीच ईश्वराकडे प्राथना.

बाबांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस्:

Aai sati Bhavpurn Shradhanjali Status
Aai sati Bhavpurn Shradhanjali Status
  1. बाबांच्या मार्गदर्शनाने आमचा जीवनाला दिशा मिळाली, बाबा तुमचा प्रेमाची छाया आजही मनावर आहे भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
  2. बाबा, तुमच्या कष्टांची कहाणी आठवून डोळ्यांत अश्रू येतात, तुमच्या त्यागाची महानता शब्दांत मांडू शकत नाही.
  3. कुटुंबासाठी सतत झटणारे आमचे बाबा आज नाहीत, त्यांचे संस्कार मात्र आमच्यात कायम राहतील.
  4. आमच्या आयुष्यातील सर्वात मजबूत खांबा आज नाही, बाबा तुमच्या आठवणीने आमचे डोळे भरून येतात, बाबा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
  5. तुमचं बोलणं, तुमचा राग आणि तुमच्या प्रमाची खूप आठवण येते, बाबा तुम्ही नाही म्हणून आमचे सर्व काही जगच संपले अस वाटेत.
  6. कुटुंबासाठी रात्र-रात्र जागणारे बाबा, तुमची मेहनत, काळजी, संस्कार कधीच विसरू शकत नाही, बाबा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.

मित्र/मैत्रीण साठी भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस्:

  1. मित्रा, तुझ्या हसण्याचा आवाज अजूनही कानात गुंजतो, तुझी मैत्री नेहमी आमच्यासोबत राहील. मित्रा तुला भावपूर्ण श्रद्धांजली.
  2. खरी मैत्री काय असते हे शिकवणारा मित्र आज तू आमचात नाही, तुझी आठवणी मात्र कायम आमचा हृदयात जपून ठेवू.
  3. आपल्या कॉलेजच्या आठवणी, मस्ती आणि गप्पा आज मनात समोर येतात, मित्रा तू खूप आठवतोस/आठवतेस.
  4. सुख-दुःखात सोबत असणारा मित्र आज दूर गेला। त्याच्या/तिच्या सोबतच्या क्षणांना आज वेगळंच मूल्य आहे.
  5. मैत्रीची किंमत तू शिकवलीस, आता तुझ्या आठवणी शिकवतात, तुझ्यासारखा मित्र कधीच मिळणार नाही, भावपूर्ण श्रद्धांजली.

भाऊ साठी भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस्:

  1. लहानपणापासून सोबत असणारा भाऊ, प्रत्येक क्षणी साथ देणारा भाऊ आज माझासोबत नाही, भाऊ तुझ्या हसऱ्या चेहऱ्याची आठवण आयुष्यभर जपून ठेवू, भाऊ तुला भावपूर्ण श्रद्धांजली.
  2. भावाचा आधार, त्याचं प्रेम आणि त्याची काळजी आज खूप आठवते, भाऊ तुझासिवाय जीवन अपूर्ण वाटतं.
  3. सोबत खेळणारा, भांडणारा आणि राग करणारा भाऊ आज नाही, भाऊ तुझी आठवणी मात्र कायम माझ्या सोबत राहतील.
  4. भाऊ म्हणजे आधार असतो, आज तो आधार नाही, भाऊ तुझ्या आठवणी मात्र माझ्या आयुष्यात कायम राहतील.
  5. भावासोबतचे सगळे क्षण आज आठवण येतात, भाऊ तुझ्या आठवणीने डोळ्यात अश्रू येतात भावपूर्ण श्रद्धांजली.
  6. भावाचं प्रेम, तुझा राग आणि तुझी काळजी आठवते, तुझ्या माझासोबतची आठवणी कधीच विसरता येणार नाही.

बहिणी साठी भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस्:

  1. ताईचं प्रेम, ताईची काळजी आणि तिचा लाडका आवाज आठवतो, आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं दूर गेलं, ताई तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
  2. लहानपणापासून सोबत खेळणारी, भांडणारी ताई आज माझासोबत नाही, ताई तुझ्या सोबतच्या आठवणी मनात कायम येत राहतील.
  3. बहिणीचं नातं किती पवित्र असतं हे आज तू नसताना कळतं, तुझ्या आठवणी कायम हृदयात जपून ठेवू.
  4. बहिणीसारखं नातं दुसरं नसतं, ताई तुझ्या जाण्याने पोकळी निर्माण झाली.
  5. बहिणीचं प्रेम, राग आणि तिची काळजी खूप आठवते, आई सारखी काळजी करणारी बहिण आज माझासोबत नाही.

अशा प्रकारे आपण मृतू झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देतो किंवा हे भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही तुमचा व्हॉट्सॲप स्टेटस ला सुद्धा लावू शकता.

Leave a Comment