दु:खद निधन (भावपूर्ण श्रद्धांजली) वाक्य | Dukhad Nidhan Message in Marathi

दु:खद निधन वाक्य : आपल्या जवळची व्यक्तीची मृतू झाल्यावर आपण त्यांना Dukhad Nidhan Message किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य बोलतो जेणेकरून त्या व्यक्ती शांती मिळेल. कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यावर आपल्याला खूप दुख होते कारण त्या व्यक्तीसोबत आपल्या आठवणी असतात परंतु काही अधभूत घटनामुळे व्यक्तीचे निधन झाल्यावर आपण त्यांना दु:खद निधन देतो. दु:खद निधन यालाच आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा म्हणतो, तर मी आज तुमचासाठी सुंदर दु:खद निधन वाक्य घेवून आलो आहे हे वाक्य तुम्ही मृतू झालेल्या व्यक्तीसाठी बोलू शकता. खाली तुम्हाला (Dukhad Nidhan Message Marathi) दु:खद निधन संदेश मराठी मध्ये दिलेले आहेत.

Dukhad Nidhan Sandesh
दु:खद निधन (भावपूर्ण श्रद्धांजली) वाक्य

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा । भावपूर्ण श्रद्धांजली

खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही, तुझ्या आठवणी झर्‍या इतकी तर साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रेमळ होतास तु, विसरेल कसे कुणी मनात येतात दाटूनी, सदैव तुझ्या आठवणी आत्म्यास शांती लाभो हीच प्रभू चरणी विनवणी भावपूर्ण श्रद्धांजली

आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली

दु:खद निधन वाक्य | Dukhad Nidhan Message

आपल्या घरात किंवा नातेवाईकांचा घरात मृतू झाल्यावर आपण त्यांना दु:खद निधन वाक्य किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य बोलतो तर हे वाक्य आपण कसे बोलावे कारण दुखात असताना माणसाला काय बोलावे हे कळतच नाही अशा करणामुळे मी तुमचासाठी हे दु:खद निधन संदेश घेवून आलो आहे. इथे तुम्हाला भरपूर संदेश मिळणार आहेत जे संदेश आवडतील ते तुम्ही तुमचा प्रेमळ व्यक्ती साठी बोलायचं आहे कारण दु:खद निधन किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य बोलल्याने ज्या व्यक्तीचे मृतू होते त्याचा आत्माला शांती मिळते. अधिक दु:खद निधन वाक्य किंवा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश खाली दिलेले आहेत.

Dukhad Nidhan Message
दु:खद निधन (भावपूर्ण श्रद्धांजली) वाक्य

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली

चंदनापरी देह झिजविला कष्टातून संसार फुलवला उरली नाही साथ तुमची आम्हास आठवण येते क्षणक्षणाला

तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आ

तिशय कष्टातून कुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडत असतांना अचानक घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून गेली… 💐भावपूर्ण श्रद्धांजली

तुम्ही जग सोडून गेलात तरी प्रेम तुमच्यावरील कमी होणार नाही… तुमच्या आठवणींशिवाय एकही क्षण जाणार नाही. 💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

दु:खद निधन आई, बाबा, भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आणि इतर माणसांसाठी

तुमचा कुटुंबातील आई बाबाचे, भाऊ बहिणीचे, मित्र मैत्रींचे, काका मावशीचे किंवा कोणत्याही व्यक्तीची मृतू झाल्यावर त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देतो कारण हे संदेश दिल्याने त्यांचा आत्माला शांती मिळते. दु:खद निधन आई, बाबा, भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आणि इतर माणसांसाठी खाली आहेत.

आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही आधार आता तुमच्याशिवाय जगायचे कसे हाच आहे मोठा प्रश्न…? 💐 भावपूर्ण श्रद्धांजली.💐

तुमची सावली होती म्हणून कधीच वाटली नाही कोणाचीही भीती… तुमची साथ अशी सुटेल हे कधी वाटलेच नव्हते ठायी… 💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

तू शिवलेल्या गोधडीची उब आजही मला जाणवते… तू प्रत्यक्षात नसली तरी तुझी माया सोबत आहे… आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो. 💐भावपूर्ण श्रद्धांजली आजी .💐

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले… आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे… 💐भावपूर्ण श्रद्धांजली.

मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते. देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा. 💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा हरपला भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही… आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही. 💐भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा.💐

बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे. पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे.. 💐बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो.💐

अशा प्रकारे आपण मृतू झालेल्या प्रेमळ व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देतो हे संदेश त्या व्यक्तींसाठी वापरा. जर या संदेशांची गरज तुमचा इतर माणसांना असेल तर तुम्ही त्यांना पाठवू शकता कारण दुखात असलेल्या माणसांना दु:खद निधन संदेश काय बोलायचे हे सुचत नाही. अधिक इतर माणसांसाठी आणि नवीन भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्हाला खाली दिलेल्या लेखामध्ये बघायला मिळणार आहेत.

Leave a Comment